Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बिलावरून वाद अन् बारमालकाच्या डोक्यावर फोडल्या बिअरच्या 30 बाटल्या

बिलावरून वाद अन् बारमालकाच्या डोक्यावर फोडल्या बिअरच्या 30 बाटल्या



चंद्रपूर : खरा पंचनामा

जिल्ह्यातील विरूर रोड येथील एका बारमध्ये ग्राहकांनी बारची मोठ्या प्रमाणात तोडफोड करत बार मालकाला मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे. बिल भरण्यावरून वाद झाल्यानंतर ग्राहकांनी बारमालकाच्या डोक्यात 30 बाटल्या फोडल्या. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

विरूर रोड येथील मुख्य मार्गावर असलेल्या सितारा बारमध्ये सोमवारी रात्री उशिरा ही घटना घडल्याची माहिती आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून बिलावरून झालेल्या वादानंतर 3 आरोपींनी बारमालकाच्या डोक्यावर अतिशय अमानुषपणे बिअर-दारूच्या तब्बल 30 बाटल्या फोडल्या.

बारमालक नारायण मंथापूरवार आणि व्यंकटेश मंथापूरवार हे मारहाणीत जखमी झाले आहेत. व्यंकटेश मंथापूरवार यांच्यावर चंद्रपूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.