4 जूनला जयंत पाटील शरद पवारांची साथ सोडणार?
मुंबई : खरा पंचनामा
महाराष्ट्र राजकारणातील आजची सर्वात मोठी बातमी आहे. शरद पवार गटाचे जयंत पाटील 4 जूननंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असा दावा अजित पवार गटाच्या सूरज चव्हाणांनी केलाय.
जयंत पाटलांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधींची वेळ मागितल्याचा खळबळजनक दावा सूरज चव्हाणांनी केलाय. सूरज चव्हाणांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. तर या निवडणुकीनंतर अजित पवार आणि शिंदे गट राहील की नाही हाच प्रश्न आहे. मात्र, हायकमांड निर्णय घेईल त्याचं समर्थन करू अशी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी दिलीय.
निवडणूकपूर्वीही अशी चर्चा गेली होती की, राष्ट्रवादीचे जयंत पाटील पक्षाला रामराम करणार आहेत. त्यावेळी जयंत पाटील राष्ट्रवादीत का राहणार नाही याची दहा कारणं भाजपने दिली होती. भाजपने यासंदर्भात एक व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडियाच्या अधिकृत अकाऊंटवर शेअर केला होता.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.