फर्ग्युसन रस्त्यावरील ड्रग्स पार्टी प्रकरणात 7 जण अटकेत; पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह चौघांचे निलंबन
पुणे : खरा पंचनामा
पुण्यातील एफसी रस्त्यावरील लिक्विड, लेजर, लाऊंज या हॉटेलमधील बॉशरूममध्ये काही अल्पवयीन मुले ड्रग्जचे सेवन करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये पार्टीसाठी कोणतीही वयाची मर्यादा ठेवण्यात आली नव्हती.
या पार्टीमध्ये काही तरुण टॉयलेटमध्ये ड्रग्ज घेताना आढळून आले तर अनेक अल्पवयीन मुलांना दारू दिली जात होती. कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर पुणे पोलीस आयुक्तांनी शहरातील सर्व पब्स आणि रुफटॉप्स मालकांना इशारा दिला होता. परंतु ड्रग्स सारख्या गंभीर विषयाकडे देखील पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा सुरू होती.
पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील ड्रग्स पार्टी प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे (गुन्हे) पोलीस निरीक्षक अनिल माने यांनी सहायक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी दोन बीट मार्शलला देखील या प्रकरणात निलंबित करण्यात आले आहे. तर आतापर्यंत या प्रकरणात सात जणांना अटक करण्यात आली आहे.
शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी संतोष विठ्ठल कामठे, सचिन विठ्ठल कामठे, उत्कर्ष कालिदास देशमाने, योगेंद्र गिरासे, रवी माहेश्वरी, अक्षय दत्तात्रय कामठे, दिनेश मानकर आणि मोहन राजू गायकवाड या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक सविता सपकाळे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.