'हिट अँण्ड रन'प्रकरणी सांगलीतील दोघांना अटक
लांजा : खरा पंचनामा
दाभोळे मार्गावर हिट अँण्ड रनप्रकरणी अखेर एक महिन्यानंतर पसार झालेल्या वाहनचालकांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. दोघांचा बळी घेणाऱ्या गुन्ह्याची उकल लांजा पोलिसांना यश आले आहे.
लांजा-आसगे दाभोळे राज्य मार्गावरील 'हिट अँण्ड रन'च्या घटनेत दोन जणांच्या मृत्यूप्रकरणी अखेर एक महिन्यानंतर सांगलीतील वाहन चालकाला अटक करण्यात पोलिसांना यश आले. रुपेश सिद्धू वाघमारे (वय ३५, रा. येलापूर, ता. सांगली) याला सांगली येथून अटक केली. लांजा दिवाणी न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या गुन्ह्याची उकल करण्यात आली. पोलिसांनी मालवाहतूक ट्रक जप्त केला आहे. २८ एप्रिलला दुपारी आसगे येथे वळणावर दाभोळे येथे जाणाऱ्या एका वाहनाने दुचाकीला चिरडले होते.
या घटनेत गोविळ येथील अशोक जाधव आणि प्रकाश जाधव यांचा मृत्यू झाला होता. लांजा कोर्ले फाटा, धुंदरे लाकूड गिरण, आसगे येथील दुकान या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यामध्ये दुपारी १ ते ३ दरम्यान सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर सांगलीतून रुपेश वाघमारेला अटक केली. अविनाश कागदोळे (रा. सांगली) याच्या मालकीचा ट्रक पोलिसांनी जप्त केला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.