"आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री अन्..."
पुणे : खरा पंचनामा
शिव प्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांनी सध्याच्या स्वातंत्र्याची तुलना "हांडग अन् दळभद्री" अशा शब्दांत केली आहे, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. संभाजी भिडे पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते.
"आपल्या जे स्वतंत्र मिळालं ते हांडग स्वतंत्र आणि दळभद्री स्वतंत्र आहे," असं विधान करताना भिडेंनी सध्याच्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उभं केलं. त्यांचं म्हणणं आहे की स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उभं केलं. त्यांचं म्हणणं आहे की हिंदवी स्वराज्य हेच खरं स्वतंत्र आहे. संभाजी भिडेंच्या या विधानामुळे विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा समाजात चर्चेचं वातावरण निर्माण झालं आहे.
वटसावित्रीच्या पूजेला नटीनी जाऊ नये, ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये, साडी घातलेल्या महिलांनीच जावं, असं विधान भिडे यांनी केलं. तसेच "गोमाता, भारतमाता, वेदमाता सारख्या 7 मतांच्या संरक्षणासाठी वाटेल ते करायला तयार असणे म्हणजे हिंदवी स्वराज्य व्रत," असं त्यांनी स्पष्ट केलं.
भिडेंनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेल्या लोकांच्या तुकड्या रायगडावर दररोज पाठवण्याचा मनोदय व्यक्त केला. "प्रत्येक तालुक्यात आपल्याला 10 हजारांची तुकडी करायची आहे," असे सांगताना त्यांनी संपूर्ण देशात हिंदवी स्वराज्याचं व्रत घेतलेली लोकं तयार करण्याचं आवाहन केल.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.