जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी म्हणून चक्क पुरुषांनी वटवृक्षाला मारले सात फेरे!
पिंपरी- चिंचवड : खरा पंचनामा
पिंपरी- चिंचवडच्या पिंपळे गुरव येथे जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी म्हणून वटवृक्षाला चक्क पुरुषाने सात फेरे मारले आहेत. आजचा हा सण महिलांसाठी असल्याचे नेहमीच बोललं जातं. याला छेद देत पुरुषांनी देखील वटवृक्षाला फेरे मारून स्त्री पुरुष समानता असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. मानवी हक्क संरक्षण या संस्थेकडून हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी पत्नीसोबत पतीने देखील वटवृक्षाला सात फेरे मारले. हे या संस्थेचे दहावा वर्ष आहे.
वटपोर्णिमा हा सण महिलांचा म्हणून ओळखला जातो. महिला जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून आजच्या दिवशी पारंपारिक पद्धतीने वेशभूषा करून वटवृक्षाला सात फेरे मारून प्रार्थना करतात. परंतु, याच परंपरेला छेद देत काही पुरुषांनी पुढे येऊन गेल्या दहा वर्षापासून वटवृक्षाला पत्नीसह स्वतः देखील सात फेरे घेऊन जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी अशी प्रार्थना करतात.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.