Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी देशाचे नवे लष्करप्रमुख

लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी देशाचे नवे लष्करप्रमुख



नवी दिल्ली : खरा पंचनामा

लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची केंद्र सरकारकडून नवे लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लेफ्टनंट जनरल द्विवेदी 30 जून रोजी विद्यमान लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्याकडून पदभार स्वीकारतील. जनरल पांडे 31 मे रोजी निवृत्त होणार होते, पण सरकारने त्यांचा कार्यकाळ 30 जूनपर्यंत वाढवला होता. त्यानंतर आता उपेंद्र द्विवेदी हे नवे लष्करप्रमुख असणार आहेत. उपेंद्र द्विवेदी सध्या उप लष्करप्रमुख म्हणून कार्यरत आहेत, त्यानंतर ते 30 जूनपासून लष्कर प्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारतील.

मध्य प्रदेशातील रीवा येथील रहिवासी असलेले लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांनी सैनिकी शाळेतून शिक्षण पूर्ण केले. त्यांनी प्रतिष्ठित डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमधून पदवी प्राप्त केली, त्यानंतर आर्मी वॉर कॉलेजमधील हायर कमांड कोर्स आणि युनायटेड स्टेट्स आर्मी वॉर कॉलेजमधील नॅशनल डिफेन्स कॉलेज कोर्समध्ये भाग घेतला. 1 जुलै 1964 रोजी जन्मलेले आणि राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी विद्यार्थी, लेफ्टनंट जनरल द्विवेदी 1984 मध्ये लष्कराच्या जम्मू व काश्मीर रायफल्सच्या 18 व्या बटालियनमध्ये भरती झाले होते.

लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांना चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर व्यापक ऑपरेशनचा अनुभव आहे. त्यांनी फेब्रुवारीमध्ये लेफ्टनंट जनरल एमव्ही सुचिंद्र कुमार यांची जागा घेतली होती आणि लष्कराचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला होता. लेफ्टनंट जनरल द्विवेदी यांना पाकिस्तान आणि चीन सीमेवर काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.