Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

साताऱ्यात उद्या एक्साईजच्या नव्या इमारतीची पायाभरणी मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

साताऱ्यात उद्या एक्साईजच्या नव्या इमारतीची पायाभरणी
मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती



सातारा : खरा पंचनामा


सातारा येथे उद्या (मंगळवारी) राज्य उत्पादन शुल्कच्या (एक्साईज) नव्या प्रशासकीय इमारतीची पायाभरणी करण्यात येणार आहे. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमासाठी उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांची तयारी पूर्ण झाली आहे. या इमारतीमुळे साताऱ्याच्या सौंदर्यात आणखी भर पडणार असल्याचे सांगितले जात आहे.

साताऱ्यातील बालविकास भवन गोडोली येथे ही इमारत उभारण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी खा. उदयनराजे भोसले, खा. धैर्यशील मोहिते-पाटील, रामराजे नाईक-निंबाळकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. शशिकांत शिंदे, आ. महादेव जानकर, आ. अरूण लाड, आ. प्रा. जयंत आसगावकर, नरेंद्र पाटील, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील, आ. दीपक चव्हाण, आ. जयकुमार गोरे, आ. महेश शिंदे, उत्पादन शुल्कचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, उत्पादन शुल्कचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन कोल्हापूरचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर, प्रभारी अधीक्षक वैभव वैद्य यांनी केले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.