राज्यातील ४४९ सहायक पोलिस निरीक्षकांची पदोन्नतीने पदस्थापना
कुपवाड ठाण्याचे प्रभारी अविनाश पाटील यांची मुंबई शहरकडे बदली
मुंबई : खरा पंचनामा
राज्य पोलिस दलाकडील तब्बल ४४९ सहायक निरीक्षकांना तात्पुरत्या स्वरूपात निरीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. पदोन्नतीनंतर या सवर् अधिकाऱ्यांची पदस्थापना करण्यात आली आहे. अपर पोलिस महासंचालक (आस्थापना) यांच्या सहीने सोमवारी हे आदेश काढण्यात आले आहेत. पदोन्नती मिळालेल्यांमध्ये सांगलीतील तत्कालीन अधिकारी संजय क्षीरसागर, प्रज्ञा देशमुख, अमितकुमार पाटील, भाग्यश्री पाटील, मायादेवी काळगावे, सरोजनी पाटील, भगवान शिंदे आदींचा समावेश आहे. कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्याचे प्रभारी अविनाश पाटील यांची पदोन्नतीने मुंबई शहर येथे बदली करण्यात आली आहे.
बदली झालेल्यांमध्ये संतोष तासगांवकर (सातारा ते पीटीसी सोलापूर), दिगंबर बिडवे (पुणे ते पीटीसी तुरची), राजकुमार भुजबळ (सातारा ते पीटीसी नानवीज), जयश्री पाटील (कोल्हापूर ते गुअवि), भालचंद्र देशमुख (सांगली ते खंडाळा), प्रवीण साळुंखे (सांगली ते गुअवि), अविनाश पाटील (सांगली ते मुंबई शहर), विठ्ठल शेलार (सातारा ते सातारा), शैलेश शिंदे (पीटीसी तुरची ते पीटीसी लातूर), धनाजी पाटील (सांगली ते नंदूरबार), प्रशांत चव्हाण (सांगली ते पोलिस नियंत्रण कक्ष मुंबई), तानाजी कुंभार (सांगली ते मुंबई शहर), प्रज्ञा देशमुख (नाहसं ते मसुप), गीतांजली बाबर (कोल्हापूर ते मुंबई शहर), संदीप वाघमारे (सांगली ते मुंबई शहर), रोहित दिवसे (सातारा ते रागुवि), भाग्यश्री पाटील (गुअवि ते मुंबई शहर), मायादेवी काळगावे (सांगली ते मुंबई शहर), वैभव पवार (सातारा ते गोंदिया), विक्रांत बोधे (सांगली ते लोहमागर् मुंबई), नवनाथ रानगट (सातारा ते मुंबई शहर), शैलजा पाटील (सातारा ते महाराष्ट्र सायबर), अमिकुमार पाटील (लाप्रवि ते मुंबई शहर), अमित शितोळे (सातारा ते मुंबई शहर), संतोष गोसावी (सांगली ते मुंबई शहर), वैभव मारकड (सांगली ते मुंबई शहर), युवराज सरनोबत (सांगली ते मुंबई शहर), नंदाताई पाटील (पीटीसी तुरची ते पालघर), नितीन कुंभार (सांगली ते मुंबई शहर), राजीव शेटके-पाटील (कोल्हापूर ते मुंबई शहर), सरोजिनी पाटील (सातारा ते मुंबई शहर), संजय क्षीरसागर (पीटीसी तुरची ते मुंबई शहर) आदी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.