पोलिसांच्या ताब्यातून भर दिवसा आरोपी पळाला
पुणे : खरा पंचनामा
हडपसर पोलिसांच्या ताब्यातून आरोपी पळून गेल्याची घटना घडली आहे. आरोपीला फिंगर प्रिंटसाठी लॉकअपमधून बाहेर काढले असता तो पोलिसांची नजर चुकवून पळून गेला. ही घटना दिडच्या सुमारास घडली.
या आरोपीला चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. गराविंद उर्फ पिंट्या घोडके असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. फिंगर प्रिंट घेत असतानाच तो खोलीतून पळून गेला. उपस्थित पोलिसांनी तातडीने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सापडला नाही.
यानंतर वॉकीटॉकीवर मेसेज प्रसारित करण्यात आला. तसेच परिसरात तातडीने नाकाबंदी ही लावण्यात आली. त्याला शोधण्यासाठी त्याच्या नातेवाईक आणि मित्र पसिवाराकडे पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. त्याचा शोध गुन्हे शाखेचे पथकही करत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.