निवडणूक आयोग निकाल बदलू शकतो!
माजी निवडणूक अधिकारी
मुंबई : खरा पंचनामा
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातील लोकसभेचे उमेदवार रविंद्र वायकर यांचा विजय सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कारण ठाकरे गटाकडून या मतमोजणीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला होता.
या आरोपानंतर आता रविंद्र वायकर यांच्या मेहुण्याने मतमोजणी केंद्रावर मोबाईल वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेनंतर आता रविंद्र वायकर यांची खासदारकी जाणार की राहणार? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यात आता माजी निवडणूक अधिकारी मोहम्मद अमीन यांनी निवडणूक आयोग निकाल बदलू शकतो, असे विधान केले आहे. या विधानाने खळबळ उडाली आहे.
माजी निवडणूक अधिकारी मोहम्मद अमीन हे आजतकच्या चर्चासत्रात सामील झाले होते. या चर्चासत्रात बोलत असताना अमीन यांनी निकालावर मोठं विधान केले आहे. ''जर आमचे अधिकारी चुकीच्या पद्धतीत गुंतले होते हे सिद्ध झाले पाहिजे, त्यानंतर निवडणूक आयोग त्याचा आधार घेईल, अंतिम अहवाल आल्यानंतर निवडणूक आयोग त्याची दखल घेईल आणि योग्य ती कारवाई करेल', असे अमीन यांनी सांगितले. इतकचं नाही तर निकालही रद्द केला जाऊ शकतो. निवडणूक आयोगाला तितका अधिकार असतो, असे अमीन यांनी म्हटले आहे. अमीन यांच्या विधानाने खळबळ उडाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.