राष्ट्रवादीनेच धुडकावली मंत्रिपदाची ऑफर; फडणवीसांची मनधरणी निष्फळ
नवी दिल्ली : खरा पंचनामा
राष्ट्रपती भवनात होत असलेल्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा एक नेता शपथ घेणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीनेच मंत्रिपदाची ऑफर धुडकावल्याचे खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सांगितले.
मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये पक्षाला कॅबिनेट मंत्रिपद द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीने केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नरेंद्र मोदी शनिवारी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत जवळपास पाच डझन खासदारांचाही शपथविधी होणार आहे. महाराष्ट्रात पाच खासदार शपथ घेणार आहेत. मात्र, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुणाचाही समावेश नसल्याने चर्चांना उधाण आले होते.
याबाबत फडणवीसांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँगेसला राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) पदाची ऑफर देण्यात आली होती. पण त्यांनी मंत्रिपदासाठी प्रफुल पटेल यांचे नाव निश्चित केले होते. ते आधीही मंत्री असल्याने त्यांना राज्यमंत्रिपद नको होते. त्यामुळे राष्ट्रवादीने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये पुन्हा पटेल यांना कॅबिनेट मंत्रिपदाची संधी द्यावी, असे सांगितले आणि राज्यमंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.