Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

लोकसभेच्या निकालाआधी उद्धव ठाकरेंना पहिला धक्का! निवडणूक आयोगाकडून कारवाईचे आदेश

लोकसभेच्या निकालाआधी उद्धव ठाकरेंना पहिला धक्का! निवडणूक आयोगाकडून कारवाईचे आदेश



मुंबई : खरा पंचनामा

लोकसभा निवडणुकीच्या निकालाला काही तास उरले असताना उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.

उद्धव ठाकरे यांनी 20 मे रोजी मतदान सुरु असताना पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. याविरोधात मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंविरोधात निवडणूक आयोगाला तक्रार दिली होती. या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेचेचे विश्लेषण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने कारवाईचे आदेश दिले आहे.

राज्यातील पाचव्या टप्यातील मतदानाच्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात पत्रकार परीषद घेतली होती. या पत्रकार परिषदेवर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी राज्य निवडणुक आयोगाला तक्रार करणारे पत्र लिहीले होते. राज्य निवडणुक आयोगाला हे पत्र केंद्रीय निवडणुक आयोगाला तक्रार पत्र पाठवले होते. याच पत्रावर केंद्रीय निवडणुक आयोगाने शेरा मारत "योग्य ती कारवाई करा" असे आदेश दिलेत. त्यानंतर आता राज्य निवडणुक आयोग काय कारवाई करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागलंय.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.