Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

८ लाखांच्या लाचप्रकरणी मनपा आयुक्तांसह स्वीय सहायक एसीबीच्या जाळ्यात

८ लाखांच्या लाचप्रकरणी मनपा आयुक्तांसह स्वीय सहायक एसीबीच्या जाळ्यात



अहमदनगर : खरा पंचनामा

महापालिका क्षेत्रात घेतलेल्या प्लॉटवर बांधकाम करण्यासाठी परवाना देण्यासाठी ९.३० लाखांची लाच मागून तडजोडीअंती ८ लाखांची लाच मागितल्याप्रकरणी अहमदनगर महापालिकेच्या आयुक्तांसह त्यांच्या स्वीय सहायकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी ही कारवाई केली.  

आयुक्त डॉ. पंकज जावळे (रा. अहमदनगर, मूळ रा. माजलगाव, जि. बीड), स्वीय सहायक श्रीधर देशपांडे (वय ४८, रा. अहमदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तक्रारदार बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांनी अहमदनगर महापालिका हद्दीतील मौजे नालेगाव येथे प्लॉट खरेदी केला आहे. त्यावर तक्रारदार आणि त्यांच्या भागिदारांना बांधकाम करायचे होते. त्या बांधकामाची परवानगी त्यांनी अर्ज दाखल केला होता. 

बांधकाम परवाना देण्यासाठी आयुक्तांचे स्वीय सहायक देशपांडे यांनी आयुक्तांच्यावतीने तक्रारदारांकडे ९.३० लाख रूपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदारांनी जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार दिली होती. त्याची पडताळणी केल्यानंतर स्वीय सहायक देशपांडे यांनी आयुक्त डॉ. जावळे यांच्याकडून बांधकाम परवानगी मिळवून देण्यासाठी ८ लाख रूपये लाचेची मागणी केली. पडताळणी दरम्यान आयुक्त डॉ. जावळे लाच मागणी करण्यासाठी स्वीय सहायक देशपांडे यांच्या प्रोत्साहित करत असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी दोघांविरोधात अहमदनगर येथील तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक किरण बिडवे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.