Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

डॉक्टर सुनेनं स्वतःला संपवलं! शिंदे गटाच्या नेत्याला पोलिसांकडून अटक

डॉक्टर सुनेनं स्वतःला संपवलं! 
शिंदे गटाच्या नेत्याला पोलिसांकडून अटक



सांगोला : खरा पंचनामा


सांगोल्यातील डॉक्टर ऋचा रुपनर आत्महत्या प्रकरणामध्ये पोलिसांनी उद्योगपती तसेच सध्या मुख्यमंत्री शिंदे गटात असणारे भाऊसाहेब रुपनर यांना आज सकाळी अटक केली आहे.

ऋचा ही भाऊसाहेब रुपनर यांची सून आहे. ऋचाने 6 जून रोजी पतीच्या त्रासाला कंटाळून राहत्या घरी आत्महत्या केली. या प्रकरणामध्ये कारवाई होत नसल्याचा आरोप केला जात होता. मागील पाच दिवसांपासून या प्रकरणात पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही असा आरोप करत शहरातील डॉक्टरांनीही ऋचाला न्याय मिळवून देण्यासाठी हलचाली सुरु केल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर आज शिंदे गटाच्या नेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणामध्ये ऋचाचा पती सुरज हा अद्याप फरार आहे.

ऋचाने गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पंढरपूर रोड येथील फॅबटेक कॉलेज वसाहतीमधील राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. 35 वर्षीय ऋचाने घरच्या जाचाला कंटाळून स्वतःला संपवल्याचा दावा केला जात होता. या प्रकरणामध्ये मागील पाच दिवसांमध्ये पोलिसांकडून कोणतीही कारवाई न करण्यात आल्याने सांगोल्यातील नागरिकांबरोबरच डॉक्टरांनाही सोशल मीडियावरुन मोहीम सुरु केली होती. ऋचाला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याची चर्चा संपूर्ण सांगोल्यात मागील काही दिवसांपासून रंगल्याचं पाहायला मिळालं. जनतेचा दबाव वाढत असल्याचं पाहून आज सकाळी पोलिसांनी ऋचाच्या सासऱ्यांना अटक केली.

सांगोला तालुक्यातील प्रसिद्ध उद्योगपती असलेल्या भाऊसाहेब रुपनर यांचा मुलगा डॉक्टर सुरजचा विवाह 12 वर्षांपूर्वी म्हणजेच 2012 मध्ये पंढरपुरमधील प्रतिष्ठित दिवंगत डॉ. संजय पाटील यांची मुलगी ऋचा झाला होता. सुरज आणि ऋचा यांना दोन मुलंही झाली. मात्र सुरज आणि ऋचा या दोघांमध्ये वारंवार वाद व्हायचे. सुरजच्या बाहेरख्यालीपणामुळे या दोघांमध्ये अनेकदा वाद होत होते. सुरजच्या या साऱ्या प्रकरणांबद्दल कुटुंबाला माहिती दिली. मात्र या गोष्टीचा राग मनात ठेऊन पती सुरज ऋचाला वारंवार मारहाण करीत असल्याचा आरोप तिची आई सुनीता पाटील तसेच भाऊ ऋषिकेश यांनी केला आहे. सुरजच्या व्याभिचारी वागणुकीला आणि सातत्याने दिल्या जाणाऱ्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून ऋचाने आत्महत्या केली, असं तिच्या माहेरच्यांचं म्हणणं आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.