ट्रकची नोंदणी असलेल्या व्हिंटेज कारमधून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची सवारी!
मुंबई : खरा पंचनामा
कोस्टल रोडची पाहाणी करताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना ज्या व्हिंटेज कारमधून सवारी केली त्या कारचा नंबर चुकीचा असल्याचं पुढे येत आहे. सोमवार, दि. १० जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोल्स रॉयस कारमधून प्रवास केला. कोस्टल रोडच्या उद्घाटनावेळी त्यांनी नवीन रस्त्यावरुन सवारी केली.
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ज्या कारमधून प्रवास केला त्या गाडीवरील नंबर हा एका ट्रकचा असल्याचं रेकॉर्डनुसार लक्षात आलेलं आहे. ही कार रेमंड ग्रुपचे अध्यक्ष गौतम सिंघानिया यांची असून १९३० चं हे मॉडेल आहे.
व्हिंटेज कारवर MH04 JU4733 अशा क्रमांकाची लायसन्स प्लेट होती. वास्तविक ज्याने हा नंबर रंगवलाय त्याने चूक केल्याचे पुढे येत आहे. कारण केंद्रीय वाहतूक मंत्रालयाच्या ऑनलाईन डेटाबेसनुसार MH04 JU4733 हा क्रमांक एका आयशर ट्रकचा आहे. हा ट्रक ठाण्यातील रहिवाशाच्या नावावर आहे.
'डेक्कन हेराल्ड' यांनी दिलेल्या वृत्तानुसार रोल्स रॉयस कारचा नोंदणी क्रमांक MH04 JV4733 असा आहे. दुसऱ्या वाहनाची नंबर प्लेट असणे हा गुन्हा असल्याचं एका आरटीओ अधिकाऱ्याने सांगितलं.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.