Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीवाडीत गांजा विक्रीसाठी आलेल्या कोथळीतील तरूणाला अटक पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली शहर पोलिसांची कारवाई

सांगलीवाडीत गांजा विक्रीसाठी आलेल्या कोथळीतील तरूणाला अटक
पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली शहर पोलिसांची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

सांगलीवाडी येथील टोल नाक्याजवळ गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या कोथळी (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) येथील तरूणाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून साडेचार किलो गांजा, एक दुचाकी, दोन मोबाईल असा पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती सांगली शहरचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.  

अरिहंत राजगोंडा पाटील (वय ३२, रा. जैन मंदिराजवळ कोथळी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विविध सणांच्या पार्श्वभूमीवर तसेच सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी दिले आहेत. त्यानुसार निरीक्षक मोरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक शहर परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी सांगलीवाडी येथील टोल नाक्याजवळ असलेल्या एका मंगल कार्यालयाजवळ एक तरूण गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पथकातील संतोष गळवे, गौतम कांबळे यांना खबऱ्याद्वारे मिळाली. 

मिळालेल्या माहितीनुसार पथकाने सांगलीवाडीतील टोल नाक्याजवळ सापळा रचला होता. त्यावेळी एका कायार्लयाजवळ एक तरूण संशयास्पदरित्या थांबल्याचे पथकाला दिसून आले. पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याच्याजवळील पिशवीची तपासणी केली. त्यामध्ये गांजा सापडला. त्या तरूणाकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने गांजा विक्रीसाठी आल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याच्याकडील गांजा, दुचाकी, दोन मोबाईल जप्त करून त्याला अटक करण्यात आली. 

सांगली शहरचे पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, शहरचे वरीष्ठ निरीक्षक संजय मोरे यांच्या मागर्दशर्नाने उपनिरीक्षक महादेव पोवार, संदीप पाटील, मच्छिंद्र बर्डे, सचिन शिंदे, संतोष गळवे, गौतम कांबळे, संदीप कुंभार, योगेश सटाले आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.