Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

एकाचं लँडिंग आणि दुसऱ्याचं टेक ऑफ; मुंबई विमानतळावरील थरार!

एकाचं लँडिंग आणि दुसऱ्याचं टेक ऑफ; मुंबई विमानतळावरील थरार!



मुंबई : खरा पंचनामा

मुंबई विमानतळावर विमानांच्या लँडिंग आणि टेकऑफचा थरार घडल्याचा व्हिडीओ समोर आला. ज्यात एकाच धावपट्टीवरून एअर इंडिया (Air India) चे विमान 320 टेक ऑफ करताना इंडिगो (IndiGo) चे 6E 6053 विमान धोकादायक लँडिंग करताना दिसले. इंडिगोच्या पायलटने घेतलेल्या या रिस्की लँडिंगमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

एअर इंडियाचे विमान धावपट्टीवरून निघाल्यानंतर काही मिनिटांत इंडिगोचे विमान खाली उतरताना दिसले. दरम्यान, ही घटना मुंबई विमानतळाच्या ATC कडून विमानाच्या लँडिंग दरम्यान मिळालेल्या चुकीच्या क्लिअरन्समुळे घडली. ज्यात कारवाई करत डीजीसीएकडून दोषी एटीसी कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 8 जून रोजी मुंबई विमानतळावर घडली. ज्यात एअर इंडियाचे विमान टेक ऑफच्या तयारीत असताना इंडिगोच्या विमानाने मिळालेल्या चुकीच्या क्लिअरन्समुळे रनवे 27 वर लँडिंग केले होते. दरम्यान, या घटनेत पायलच्या तप्तरतेमुळे अनेकांचा जीव बचावला. अन्यथा मोठी दुर्घटना ही अटळ होती.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.