लोकसभा निवडणुकीत भाजपचे चार आमदार फेल
आशिष शेलारांच्या मतदारसंघात निकमांना नाममात्र आघाडी
मुंबई : खरा पंचनामा
महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणूक निकालांत महाविकास आघाडीनं धुरळा उडवल्याचं पाहायला मिळालं. महाविकास आघाडीचा निवडणूक निकालांत 30 जागांवर विजय झाला असून महायुतीला केवळ 17 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. अशातच महायुतीत भाजपला केवळ 9 जागांवर समाधान मानावं लागलं असून गेल्यावेळी भाजपला 23 जागांवर विजय मिळाला होता. मुंबईतही महायुतीची जादू फारशी चालली नाही. निकालाअंती मुंबईचे किंग ठाकरेंच असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं. मुंबईतील सहापैकी चार जागा ठाकरेंनी लढवल्या होत्या, त्यापैकी तीन जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. तर एका जागेवर काँग्रेसनं विजय मिळवला आहे. म्हणजेच, मुंबईतील सहापैकी चार जागा महाविकास आघाडीनं जिंकल्या आहेत.
महत्त्वाची आणि धक्कादायक बाब म्हणजे, मुंबईतील भाजप आमदारही निवडणुकांतील खासदारांना बहुमत मिळवून देण्यात कमी पडले. लोकसभा निवडणुकीच्या निकालांत भाजपच्या मुंबई अध्यक्षांसह चार आमदार फेल झाले आहेत. मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांच्या विधानसभेत उज्ज्वल निकमांना नाममात्र आघाडी मिळाली आहे. तर, महायुतीला आशिष शेलारांकडून फक्त 3 हजार 606 मतांची आघाडी घेता आली. भाजपच्या 3 आमदारांच्या मतदारसंघात तर महायुतीचे उमेदवार पिछाडीवर आहेत.
दक्षिण मध्य मुंबईतून लोकसभा लढवत असलेल्या राहुल शेवाळेंनाही आमदार कॅप्टन तमिल सेल्वन यांचा फारसा फायदा मिळालेला नाही. सेल्वन यांच्या मतदारसंघात शेवाळे पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळालं. तब्बल 9 हजार 312 मतांनी पिछाडीवर होते. याशिवाय मिहीर कोटेचा यांनाही घाटकोपरचे आमदार राम कदम यांचा फारसा उपयोग झाला नाही. राम कदमांच्या मतदारसंघातून कोटेचांना तब्बल 15 हजार 772 मतांचा फटका बसल्याचं पाहायला मिळालं.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.