मराठा आरक्षणासाठी आणखी एक बळी!
बारावीत ९० टक्के मिळवूनही मुलाला इंजिनीअरिंगला प्रवेश मिळेना; पित्याने आयुष्य संपवलं
छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा
मराठा आरक्षणासाठी ४१ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात घडली आहे. बारावीमध्ये ९० टक्के मार्क मिळूनही मुलाला इंजिनिअरिंगला प्रवेश मिळत नसल्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी एका पित्यानेच आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना समोर आलेली आहे. बाबासाहेब जनार्धन पडूळ (वय वर्ष 41) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील लाडसावंगी येथील रहिवासी आहेत.
बाबासाहेब पडूळ यांच्या मुलाला बारावीच्या परीक्षेत 90 टक्के मार्क मिळाले होते. मात्र तरीही इंजिनिअरिंगला नंबर लागत नसल्याची खंत त्यांच्या मनामध्ये होती. गेल्या अनेक वर्षांपासून ते आरक्षण लढ्यामध्ये सक्रियपणे आंदोलनात सहभागी होत असतात. त्याबद्दल त्यांनी एक चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याचं सांगितले जात आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या घाटी हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे. याबाबतची माहिती मिळताच गावकऱ्यांसह, मराठा बांधवांनी मोठी गर्दी केली आहे. दरम्यान, एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबात आवाज उठवत लक्षवेधी लढा सुरू केलेला असतानाच ही आत्महत्येची घटना समोर आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.