कळंबा कारागृहात कैद्याचा तुरुगाधिकाऱ्यावर हल्ला
कोल्हापुर : खरा पंचनामा
कोल्हापुरातील कळंबा कारागृहात कैद्याने तुरुग अधिकाऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी विवेक उर्फ सोन्या सोपान काळभोर याच्या विरोधात राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कळंबा कारागृहातील बंदीजन विवेक उर्फ सोन्या सोपान काळभोर याने तुरुग अधिकारी भारत उत्तरेश्वर पाटील यांच्यावर काठीने हल्ला चढविला. काळभोर याने पाटील यांना लाथा देखील मारल्या.
नातेवाईकांच्या भेटीसाठी मुलाखत कक्षात घेऊन जाण्यासाठी वेळ केल्याच्या रागातून काळभोरने पाटील यांच्यावर हा हल्ला केल्याचे समजते. या मारहाण प्रकरणी विवेक काळभोर याच्यावर राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.