मैदानात 'चिखल', मैदानी चाचणीची तारीख ढकलली पुढे
सोलापूर : खरा पंचनामा
राज्यात पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला सुरुवात झाली असून ऐन पावसाळ्यात घेण्यात येत असलेल्या या चाचणीवर अनेक ठिकाणी आक्षेप घेतला जात आहे. पावसामुळे मैदानावर चिखल झाल्यानं चाचणी घेणं अडचणीचं ठरत आहे. त्यातच यामुळे उमेदवारांवर अन्याय होत असल्याचंही भरतीसाठी आलेल्या उमेदवारांनी म्हटलंय. दरम्यान, सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने ज्या उमेदवारांची चाचणी होऊ शकली नाही त्यांच्यासाठी नवी तारीख दिली आहे.
पावसामुळे मैदानी चाचणी होऊ न शकलेल्या उमेदवारांची चाचणी आता पुढे ढकलण्यात आलीय. ज्या उमेदवारांची मैदानी चाचणी बाकी आहे त्यांची चाचणी २८ जून रोजी घेतली जाईल अशी माहिती सोलापूर ग्रामीण पोलिसांनी दिलीय. तसंच त्या दिवशी ज्यांची इतर ठिकाणी भरती असेल त्यांनी तिथे भाग घेतल्याचं प्रमाणपत्र घेऊन २९ जून रोजी सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालय कवायत मैदानावर हजर रहावं असं सोलापूर पोलिसांनी सांगितलंय.
सोलापूर ग्रामीण दलाच्या चाचणी मैदानावर पावसामुळे चिखल झाला होता. 255 पोलीस भरती उमेदवारांपैकी केवळ 49 उमेदवारांची चाचणी घेण्यात आली होती. तर उर्वरित 206 उमेदवारांची 100 मीटर आणि 1600 मीटर मैदानी चाचणी राहिली होती. आता त्यांची चाचणी 28 जून रोजी घेतली जाणार आहे.
पहिल्या दिवशी पावसाने व्यत्यय आणल्यामुळे उमेदवारांनी मैदानावर चिखल असल्यामुळे मैदानी चाचणी न घेण्याची विनंती उमेदवारांनी केली होती. पहिल्या दिवशी 255 उमेदवारांची गोळा फेक चाचणी पूर्ण केली गेली. तर 49 उमेदवारांची शंभर मीटर धावण्याची मैदानी चाचणी घेतली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.