Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'क्रीम पोस्टिंग'साठी 'कलेक्टरां'ची फिल्डिंग! गॅझेटकडे अंमलदारांचे लक्ष, साहेबांवर विविध मार्गाने दबाव टाकण्याचा प्रयत्न

'क्रीम पोस्टिंग'साठी 'कलेक्टरां'ची फिल्डिंग!
गॅझेटकडे अंमलदारांचे लक्ष, साहेबांवर विविध मार्गाने दबाव टाकण्याचा प्रयत्न



सांगली : खरा पंचनामा

जून महिन्यातील शेवटचा आठवडा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. वार्षिक बदल्यांचे गॅझेट याच आठवड्यात होणार आहे. त्यामुळे बदल्यांसाठी अनेक अंमलदारांनी फिल्डिंग लावली आहे. विशेष म्हणजे विशिष्ट शाखेत जाण्यासाठी तसेच 'क्रीम पोस्टिंग'साठी काही जुन्या कलेक्टरांनी चांगलीच फिल्डिंग लावली आहे. पुन्हा 'कलेक्टर' म्हणूनच पोस्टिंग मिळावी म्हणून संबंधितांनी साहेबांवर विविध मागार्ने दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

लोकसभा निवडणुकीनंतर शासकीय सर्व विभागांच्या बदल्यांना ३० जूनपर्यन्त मुदतवाढीची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे सार्वत्रिक बदल्या रखडल्या आहेत. त्याशिवाय अनेक शासकीय विभागात काही प्रशासकीय कामे सुरू असल्याने अंमलदारांचे वार्षिक गॅझेटही रखडले आहे. आता जूनच्या शेवटच्या आठवड्यात ते फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याकडे सवर्च अंमलदारांचे लक्ष लागून राहिले आहे. नेहमीच वशिल्याचे तट्टू राहिलेले काही कलेक्टरांचे आपरेशन करून डॉक्टरांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी पाठवले होते.  

आता या गॅझेटमध्ये विशिष्ट शाखेत तसेच मलिदा असणाऱ्या ठिकाणी पोस्टिंग व्हावी यासाठी या जुन्या जाणत्या कलेक्टरांनी फिल्डिंग लावली आहे. यासाठी काही ठिकाणी साहेबांकडून किरकोळ 'कलेक्शन'चे कामही घेतले आहे. त्यातूनच आपला प्रामाणिकपणा आणि 'उत्पन्नातील वाढी'बाबत आश्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही 'कलेक्टरां'ची तर अनेक व्यवसायात भागिदारीही आहे. त्या व्यावसायिकांना मात्र 'मंथली'मधून सूट देण्याचे आश्वासनही या कलेक्टरांनी संबंधितांना दिले आहे. 

त्यामुळे जिल्ह्यात नव्याने दाखल झालेल्या खातेप्रमुखांनी केवळ त्यांच्या सेवेची शासकीय कागदपत्रे न पाहता गॅझेट करताना संबंधितांचे अन्य कारनामे लक्षात घेऊनच बदल्या कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शिवाय पोस्टिंगसाठी साहेबांवर विविध मार्गाने दबाव टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनाही संबंधितांना साजेशी पोस्टिंग दिली जावी अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.