राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीसाठी हालचालींना वेग; ४ जुलैला सुनावणी
मुंबई : खरा पंचनामा
विधानसभा निवडणुकीआधी राज्यात राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीच्या हालचालिंना वेग आला आहे. ४ जुलै रोजी याबाबत सुनावणी होणार आहे. दरम्यान, या सुनावणीत निर्णय येणार असल्याची शक्यता आहे.
महायुतीमध्ये सध्या १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आता जास्त जागांसाठी भाजपा आग्रही असल्याचे बोलले जात आहे.
सध्या १२ जागा खाली आहेत. या जागांवर नियुक्त करण्याच्या हालचाली सुरू आहेत. अनेकांनी यासाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. १२ जागांपैकी प्रत्येकी चार, चार जागा मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात या १२ आमदारांच्या नियुक्तीसाठी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना यादी देण्यात आली होती. कोश्यारी यांनी या नियुक्त्या अडवून धरल्या होत्या. यानंतर हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. येत्या ४ जुलै रोजी यावर सुनावणी होणार आहे. या सुनावणीत महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता असून राज्यपाल नियुक्त आमदारांचा मार्ग मोकळा होऊ शकतो, असं बोलले जात आहे. यामुळे आता महायुतीमध्ये जोरदार हालचाली सुरू आहेत.
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. ११ सदस्यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ येत्या २७ जुलैला संपत आहे त्यामुळे ही निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. १२ जुलैला यासाठी निवडणूक होणार आहे. दरम्यान, महायुतीमध्ये जागावाटपात भाजापाचा वरचष्मा असल्याचे पाहायला मिळाले. यात पाच जागांवर भाजपा तर प्रत्येकी दोन जागांवर अजित पवार गट आणि शिंदे गट उमेदवार देणार आहेत. या ११ जणांचा विधान परिषद सदस्याचा कार्यकाळ २७ जुलैला संपत आहे. तत्पूर्वी या जागांवर निवडणूक जाहीर झाली आहे. १२ जुलैला मतमोजणी आणि त्याच दिवशी निकाल लागणार आहे.
दरम्यान, येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. याआधी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला धक्का बसला. महाविकास आघाडीला जास्त जागा मिळाल्या. आता महायुतीने विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे. याआधी राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नियुक्ती होऊ शकते. ४ जुलै रोजी होणाऱ्या सुनावणीत या नियुक्तीसाठी हिरवा कंदिल मिळू शकतो. यामुळे आता महायुतीत हालचाली सुरू झाल्या आहेत. इच्छुक नेत्यांनी अर्ज करण्यास सुरूवात केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.