सांगली भूमी अभिलेख कार्यालयात सावळा गोंधळ
अशोक मासाळे; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
सांगली : खरा पंचनामा
येथील भूमी अभिलेख कार्यालयात सावळा गोंधळ सुरू आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा सर्व सामान्य नागरिकांना फटका बसतो आहे. झिरो कर्मचारी या विभागाचे मालक झाले आहेत. सर्वसामान्यांची अडवणूक होते. मात्र एजंटांची कामे तातडीने होतात. या कडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोक मासाळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मासाळे म्हणाले, सांगलीचे भूमिअभिलेख कार्यालयाची अवस्था "असून अडचण नसून खोळंबा" या म्हणी प्रमाणे झाली आहे. किरकोळ कांमासाठी नागरिकांना हेलपाटे मारण्यास सांगणे, वेळेत काम पूर्ण न करणे, मोजणी साठी नोंदणी करूनही प्रतीक्षेत ठेवणे असा मनमानी कारभार या विभागात सुरू आहे. कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी नागरिकांना उद्धट उत्तरे देतात. १५ दिवसांच्या आत मोजणी करण्याचा शासनाचा नियम असताना प्रत्यक्षात ३ ते ४ महिने लावली जातात.
संगणकावर काम करण्यासाठी खासगी एजटांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे महत्वाची शासकीय कागदपत्रे दिली जातात.विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेसमोर असे प्रकार सुरू आहेत. मात्र दखल घेतली जात नाही. जिल्हाधिकारी यांनी या विभागाचा आढावा घ्यावा. कार्यालयाला शिस्त लावावी. बेजबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्याची बदली करावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा मासाळे यांनी दिला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.