Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

माजी पोलिस आयुक्त संजय पांडे विधानसभेच्या मैदानात!

माजी पोलिस आयुक्त संजय पांडे विधानसभेच्या मैदानात!



मुंबई : खरा पंचनामा

लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेणारे मुंबईची माजी पोलिस आयुक्त विधानसभा निवडणूक लढणार आहेत. साम टिव्हीने या विषयीचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. पांडे हे उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून लोकसभा निवडणूक अपक्ष लढण्याच्या तयारीत होते.

मात्र, महाविकास आघाडीच्या विनंती नंतर त्यांनी माघार घेतली होती. पांडे हे स्वतंत्र संघटना काढून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी ते आढावा देखील घेत आहेत.

लोकसभा निवडणुकीच्यावेळी अनेक नागरिकांनी आपल्याकडे निवडणूक लढण्याचा आग्रह धरल्याचे संजय पांडें यांनी आपल्या फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून सांगितले. नागरिकांच्या आग्रहावर मी विचार करत होतो. रिटायरमेंट नंतर आलेल्या अडचणीत विषयी देखील पांडे बोलले आहेत. ते म्हणाले मी आयपीएस म्हणून रियाटर झालो. माझ्यावर केस असल्याने दिल्लीमधील केसमध्ये मला जामीन मिळायला अडचण येत होती. त्यामुळे सामान्य माणसांना किती अडचणी येत असतील. त्यामुळे सामान्य माणसांसाठी संघटना स्थापन करून त्यांना मदत करणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.