Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राहुल नार्वेकरांना न्यायालयाने ठोठावला तीन हजारांचा दंड

राहुल नार्वेकरांना न्यायालयाने ठोठावला तीन हजारांचा दंड



मुंबई : खरा पंचनामा

कोरोना काळात वीज दरवाढीविरुद्ध आंदोलन करून बेस्टच्या महाव्यवस्थापकांना मारहाण केल्याप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह भाजपच्या २० पदाधिकाऱ्यांविरुद्ध सत्र न्यायालयात खटला सुरु आहे. या खटल्याच्या सुनावणीला राहुल नार्वेकर यांनी दांडी मारल्यामुळे न्यायालयाने त्यांना ३ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

कोविडच्या महामारीत अनेकांना नोकरी, व्यवसायपासून मुकावे लागले. पोटाची खळगी भरण्याचे वांदे असतानाच बेस्ट प्रशासनाने भरमसाठ बिले ग्राहकांना पाठवली होती. त्याविरोधात भाजपने बेस्ट विरोधात आंदोलन करून बेस्टच्या महाव्यवस्थापकांना घेरण्याचा प्रयत्न झाला होता.

याप्रकरणी कुलाबा पोलिसात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह आमदार अतुल शहा व अन्य पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

या सर्वांवर आरोप निश्चिती करण्यात आली असली तरी संबंधितांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. याप्रकरणाची सुनावणी विशेष सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यापुढे सुरु आहे. सध्या साक्षीदारांची उलटतपासणी घेतली जात आहे.

शुक्रवारच्या सुनावणीला राहुल नार्वेकर हे गैरहजर राहिले. मागील तीन वर्षांपासून खटला सुरु असून उच्च न्यायालयाने जलदगती सुनावणीचे निर्देश दिले असूनही नार्वेकर यांनी गैरहजेरी लावल्यामुळे न्यायालयाने नार्वेकर यांना ३ हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच ८ जुलैच्या पुढील सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.