Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मला मुक्त करा!

मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मला मुक्त करा!



कराड : खरा पंचनामा

लोकसभा निवडणुकीत सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले उभे नसून शंभूराज देसाई उभे राहिले आहेत. त्यामुळे शिवसेना व देसाई गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मताधिक्य देवून विजयी करावे असा प्रचार मी करुनसुध्दा उदयनराजे भोसले यांना पाटण विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळाले नाही.

उदयनराजे भोसले विजयी झाले असले तरी घटलेल्या मताधिक्यामुळे शंभूराज देसाई यांचा पराभव झाला आहे. मंत्रिपदामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या डोक्यात सत्ता जाऊन त्यांना सूज व सुस्ती आल्यामुळे घटलेले मताधिक्य ही माझी जबाबदारी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मी अपेक्षाभंग केला आहे. यामुळे मला मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करणार असल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई सांगितले.

सातारा लोकसभा मतदारसंघात पाटण तालुक्यातून महायुतीच्या उदयनराजे भोसले यांच्या पाटण तालुक्यातील मताधिक्यात घसरण होऊन विरोधी शशिकांत शिंदे यांना मताधिक्य मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा मेळावा पालकमंत्री देसाई यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते.

पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले यांना पाटण तालुक्यातून मताधिक्य घटले याचे शल्य आहे. उदयनराजे या निवडणुकीत विजयी झाले असले तरी शंभूराज देसाई यांचा पराभव झाला आहे. मी खुर्चीला चिटकून बसणारा कार्यकर्ता नाही. तालुक्यातील जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या हितासाठी सत्ता मिळवली. ती सत्ता जनतेला व कार्यकर्त्याना टिकवता आली नाही. यापुढील काळात संघटनेसाठी काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.