Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महाराष्ट्रातील पोलिस अधिकारी, अंमलदारांसाठी रेल्वेच्या तात्काळ कोट्यात जागा आरक्षित ठेवावी खासदार विशाल पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

महाराष्ट्रातील पोलिस अधिकारी, अंमलदारांसाठी रेल्वेच्या तात्काळ कोट्यात जागा आरक्षित ठेवावी
खासदार विशाल पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी



सांगली : खरा पंचनामा

महाराष्ट्र राज्यातील पोलिस अधिकारी आणि अंमलदारांना विविध गुन्ह्यांच्या तपासासाठी तसेच न्यायालयीन कामकाजासाठी वारंवार देशातील अन्य राज्यांमध्ये जावे लागते. यावेळी त्यांना परराज्यात तसेच राज्यातील दूरच्या जिल्ह्यात जाण्यासाठी रेल्वेप्रवास करावा लागतो. संबंधित कामासाठी वेळेत पोहोचणे आवश्यक असल्याने पोलिसांना संपूर्ण देशभरात रेल्वेने प्रवासासाठी तात्काळ कोट्यामध्ये रेल्वे तिकीटे आरक्षित करावी अशी मागणी सांगलीचे खासदार विशाल पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.  

राज्यातील पोलिसांना आवश्यक कामासाठी रेल्वे प्रवास करण्यासाठी वारंट दिले जाते. मात्र त्यावर रेल्वे प्रशासनाकडून पोलिसांना तात्काळ कोट्यातून तिकीटे उपलब्ध करून दिली जात नाहीत. त्यामुळे अनेकदा पोलिसांना कामाच्या ठिकाणी वेळेत आणि जलद पोहोचणे शक्य होत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील पोलिस अधिकारी, अंमलदारांना शासकीय कामासाठी रेल्वे प्रवास करताना रेल्वेच्या तात्काळ कोट्यातून तिकिटे उपलब्ध करून द्यावीत. अशी पोलिसांची मागणी आहे. याबाबत संसदेच्या अधिवेशनात खासदार विशाल पाटील यांनी प्रश्न उपस्थित करून त्याबाबत निर्णय होईपर्यंत पाठपुरावा करावा अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे. 

रेल्वे विभागाने याबाबत सकारात्मक निर्णय घेतल्यास त्याचा फायदा केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर अन्य राज्यातील पोलिस अधिकारी, अंमलदारांना होणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. सांगलीतील पोलिस अंमलदार भालचंद्र चव्हाण यांनी याबाबतचे निवेदन खासदार विशाल पाटील यांना दिले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.