Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ठाकरे गटापाठोपाठ भाजप उमेदवारानेही ईव्हीएमवर व्यक्त केली शंका

ठाकरे गटापाठोपाठ भाजप उमेदवारानेही ईव्हीएमवर व्यक्त केली शंका



नवी दिल्ली : खरा पंचनामा

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात शिवसेनेच्या रवींद्र वायकर यांनी अवघ्या 48 मतांनी ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकर यांच्यावर विजय मिळवला. यानंतर ठाकरे गटासह विरोधक उमेदवारांकडून ईव्हीएम हॅक केल्याची शंका उपस्थित करण्यात आली.

यावरून सध्या महाराष्ट्रातील राजकारण गाजत असतानाच एका अहवालानुसार, देशभरातून असे दजनभर अर्ज निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आल्याचे समोर आले आहे. यामध्ये भाजप उमेदवाराचादेखील समावेश आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुजय राधाकृष्ण विखेपाटील यांनी क्षेत्रनिहाय ईव्हीएम युनिटची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव पत्करलेल्या अनेक उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे अर्ज करून ईव्हीएम व्हीव्हीपीएटी तपासण्याची मागणी केली. यामध्ये भाजपच्या उमेदवारांसह अन्य पक्षांच्या उमेदवारांचाही समावेश आहे. या अर्जामध्ये उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन आणि व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (EVM-VVPAT) युनिटची मेमरी व्हेरिफिकेशनची मागणी केली. यातील अनेक उमेदवारांनी 1 ते 3 ईव्हीएम युनिटच्या पडताळणीची मागणी केली. पण, काही उमेदवारांनी यापेक्षा अधिक युनिटची चौकशी करण्याची मागणीही केली. या उमेदवारांना प्रत्येक ईव्हीएम युनिटसाठी 40,000 रुपये आणि 18 टक्के जीएसटी भरावे लागले.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघामधील भाजपचे उमेदवार सुजय विखेपाटील यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय ईव्हीएम युनिटची चौकशी करण्याची मागणी केली. त्यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नीलेश लंके यांच्याविरोधात 28,929 मतांनी पराभव पत्करावा लागला होता. तसेच, ओडिशातील झारसुगुडामधील बिजू जनता दलाच्या उमेदवार दीपाली दास यांनीही हीच मागणी केली. भाजपच्या टंकधर त्रिपाठी यांनी 1,265 मतांनी त्यांचा पराभव केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार एकूण 19 फेऱ्यांपैकी 17 व्या फेरीपर्यंत दास या आघाडीवर होत्या. पण शेवटच्या 2 फेऱ्यांमध्ये त्या मागे पडल्या. दास यांनी यावेळी सांगितले की, त्यांनी निवडणूक आयोगाकडून 13 मशीनची पडताळणी मागितली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.