'अमित शाहांना सांगितलेलं शिवसेना पक्ष चिन्ह काढू नका...'
मुंबई : खरा पंचनामा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर थेट भाजपवर हल्ला चढवला आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंना मिळाल्यानंतर राज ठाकरेंनी याबाबत अनेकदा अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली होती. मात्र आज (13 जून) पहिल्यांदाच त्यांनी यावरून भाजपवर थेट टीका केली आहे.
मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची आज मुंबईत एक बैठक आयोजित करण्यात आली होती. जिथे बोलताना राज ठाकरे यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीबाबत मार्गदर्शन केलं. मात्र, त्याचवेळी त्यांनी शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हावरून भाजपवर टीकाही केली. 'भाजपने बाळासाहेब ठाकरे या नावाला अंडरएस्टिमेट केलं.' असं म्हणत राज ठाकरेंनी पहिल्यांदाच आपला संताप व्यक्त केला.
'शिवसेनेचे चिन्ह आणि नाव हे बाळासाहेब ठाकरे यांचे आहे. त्याला तुम्ही हात घालू नका ते उद्धव ठाकरेंचे नाही हे दिल्लीत अमित शहा यांना सांगितले होते.' 'बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल महाराष्ट्रातील जनता भावनिक आहे. पक्ष आणि चिन्ह काढू नका असे भाजप नेत्यांना अमित शाहांनाही सांगितले होते. पण बाळासाहेब ठाकरे या नावाला भाजपने अंडरएस्टिमेट केले. हे चिन्ह आणि नाव बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः कमावलं होतं.' असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.