भाजपवर दबाव सुरू, नितीश कुमार, चंद्रबाबूंच्या 'त्या' मागणीने मोदींना टेन्शन
नवी दिल्ली : खरा पंचनामा
लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालाने भाजपला अपेक्षित यशाचा टप्पा गाठता आला नाही. मित्र पक्षांच्या मदतीने भाजपने 300 जागांच्या जवळपास झेप घेतली. भाजप डिनर डिप्लोपसीच्या माध्यमातून पोटातून हृदयात जागा अजून पक्की करण्याचा प्रयत्न करत आहे.
तर दुसरीकडे मित्र पक्षांनी पण धक्कातंत्राचा वापर सुरु केला आहे. चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार हे किंगमेकर ठरणार असल्याचे निकालावरुन स्पष्ट होत आहे. त्यात चंद्रबाबू यांनी तर मागण्यांचा खलिता पण तयार केल्याचे सांगण्यात येत आहे. या मागण्यांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे टेन्शन वाढणार असे चित्र आहे.
चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार एनडीए आघाडीवर दबाव तंत्राचा वापर करत असल्याचे समजते. लोकसभा अध्यक्षपदासाठी दोन्ही पक्ष आग्रही आहेत. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार दोघेही लोकसभा अध्यक्षपदाची मागणी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पंतप्रधान मोदी आणि भाजप ही मागणी मान्य करणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
चंद्राबाबू नायडू पक्षाच्या आमदारांसोबत बैठक घेणार आहेत. टीडीपी आमदारांशी बैठक केल्यानंतरच चंद्राबाबू नायडू दिल्लीला रवाना होणार आहेत. नायडू टीडीपी आमदारांची मत जाणून घेणार आहेत. चंद्राबाबू नायडू यांचा कल इंडिया आघाडीकडे की NDA कडे आज संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल.
चंद्राबाबू नायडू यांना अखिलेश यादव भेटणार आहेत. आज दोन्ही नेत्यांची दिल्लीत भेट होणार असल्याची माहिती समोर येत आहे. इंडिया आघाडीकडून नायडू यांच्याशी संपर्क साधण्याची जबाबदारी अखिलेश यादव यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तेलंगणा मुख्यमंत्री रेवंत रेड्डीही चंद्रबाबू नायडू यांच्याशी संपर्क साधू शकतात. इंडिया आघाडीतील नेत्यांनी रेवंत रेड्डी यांना भेट घेण्याची जबाबदारी दिली आहे. इंडिया आघाडीत कदाचित चांगल्या पदाची, मंत्रालयाची ऑफर त्यांना देण्यात येऊ शकते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.