'NEET' पेपरफुटीवरुन विरोधकांचा गदारोळ, लोकसभा तहकूब
नवी दिल्ली : खरा पंचनामा
मोदी सरकारच्या कार्यकाळातील लोकसभेच्या संसद अधिवेशनाचा आज (दि.२८ जून) चौथा दिवस आहे. दरम्यान विरोधी पक्ष नेत्यांकडून 'NEET' पेपरफुटी प्रकरणाच्या चर्चेची मागणी करण्यात आली.
यावेळी विरोधी पक्षाने संसद सभागृहात प्रचंड गदारोळ केला. त्यामुळे लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले.
परंतु, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर प्रथम चर्चा करावी असा आग्रह धरला. दरम्यान विरोधकांनी सभागृहात 'NEET' पेपरफुटी प्रकरणावरून गदारोळ केला. त्यामुळे अध्यक्ष बिर्ला यांनी लोकसभा तहकूब केली. पुन्हा सोमवार १ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पुन्हा लोकसभेचे कामकाज सुरू होईल, असे स्पष्ट केले.
मोदी सरकारच्या तिसऱ्या काळातील संसदेच्या अधिवेशनाला २५ जूनपासून सुरूवात झाली. यानंतर नरेंद्र मोदी यांच्यासह नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी झाला. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष म्हणून ओम बिर्ला यांची नेमणूक झाली तर काँग्रेसनेते राहुल गांधी यांची विरोधी पक्ष नेते म्हणून निवड झाली.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्षकांना NEET विषयावर आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेतलेल्या परीक्षांमधील 'अनियमितता' यावर चर्चेला परवानगी देण्याची विनंती केली आणि ही ' देशातील युवकांचा महत्त्वाचा मुद्दा' असल्यावर भर दिला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.