परळी, कागल ते आंबेगाव, शरद पवारांनी 20 जागा हेरल्या, दादांच्या आमदारांविरुद्ध तरुण उमेदवार देणार!
मुंबई : खरा पंचनामा
लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेलाही राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळणार आहे. त्या दृष्टीने दोन्ही पक्षांनी तयारी सुरू केली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने तीन युवा उमेदवारांच्या नावाची घोषणाही यापूर्वी केली आहे.
राष्ट्रवादीकडून यापूर्वी तासगाव विधानसभा मतदारसंघासाठी रोहित पाटील तर, अहमदनगरच्या अकोले मतदारसंघातून अमित भांगरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. त्यानंतर, आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 20 मतदारसंघात तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामध्ये, अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील दिग्गजांविरुद्ध नवे चेहरे मैदानात असणार आहेत. त्यात, अजित पवारांच्या पक्षातील मंत्र्यांविरुद्ध शरद पवारांनी दंड थोपटल्याचं दिसून येत आहे.
विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाकडून 20 युवकांना संधी देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. पक्ष सोडून गेलेल्या बंडखोर आमदारांविरोधात शरद पवारांनी दंड थोपटले असून प्रमुख 20 विधानसभा मतदारसंघात तरुणांना मैदानात उतरवण्यात येणार असल्याचे समजते. त्यामध्ये, धनंजय मुंडेंचच्या परळी, हसन मुश्रीप यांच्या कागल, दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव तर, आदिती तटकरेंच्या श्रीवर्धन मतदारसंघातूनही नवयुवकांना संधी देण्यात येणार आहे. त्यादृष्टीने राज्यातील 20 मतदारसंघात चाचपणी सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तासगाव आणि अकोले मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने यापूर्वीच युवा उमेदवारांच्या नावाची घोषणाही केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.