Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

वाळू तस्करी करणारे 7 हाइवा डंपर जप्त तीन कोटीचा मुद्देमाल हस्तगत; चकलांबा पोलिस, महसूल पथकाची संयुक्त कारवाई

वाळू तस्करी करणारे 7 हाइवा डंपर जप्त
तीन कोटीचा मुद्देमाल हस्तगत; चकलांबा पोलिस, महसूल पथकाची संयुक्त कारवाई



बीड : खरा पंचनामा

चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे तसेच गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे यांना गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली होती की, चकलांबा पोलिस ठाणे हद्दीतील राक्षस भवन येथील नदीपात्रात सहा ते सात हायवा वाळू भरण्या कामी येणार आहेत त्याप्रमाणे सापळा लावून शिताफिने  गावकऱ्यांच्या मदतीने छापा टाकला असता. वाळूची तस्करी करणारे सात हायवा पकडण्यात यश आले. सदरचे हायवा हे पोलीस संरक्षणात एसटी स्टँड गेवराई येथे लावून पुढील दंडात्मक कारवाईसाठी तहसील कार्यालय गेवराई यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले.

पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर  साहेब, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर  साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी गेवराई यांच्या मार्गदर्शनाखाली  चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नारायण एक शिंगे, गेवराई तहसील चे तहसीलदार संदीप खोमणे साहेब तसेच टीम, पोलीस उपनिरीक्षक तांगडे, पोलीस हवालदार येळे, पोलीस शिपाई घोंगडे, पोलीस शिपाई सुरवसे, तसेच चालक गरजे आदींनी केली

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.