औषधांच्या नावाखाली गोवा दारूची तस्करी; एकाला अटक, 87 लाखांचा मुद्देमाल जप्त
कराड : खरा पंचनामा
कराड-चांदोली रोडवर औषधांच्या नावाखाली गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणारा ट्रक राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडला. याप्रकरणी ट्रक चालकास अटक केली आहे. त्याच्याकडून 87 लाख 11 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बनवारी राम (वय 33, रा. जोधपूर, राजस्थान) असे अटक केलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग सातारचे अधीक्षक वैभव वैद्य यांच्या नेतृत्वाखाली उत्पादन शुल्क विभाग कराडच्या पथकाला मिळालेल्या बातमीनुसार लोहारवाडी (ता. कराड) गावच्या हद्दीत कराड-चांदोली रोडवर दहा चाकी ट्रक गोवा बनावटीची दारूची तस्करी करीत असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने लोहारवाडी गावच्या हद्दीत ट्रक थांबवून ट्रकची झडती घेतली असता, ट्रकमध्ये 87 लाख 11 हजार किमतीची गोवा राज्यात निर्मित व विक्री असलेले रॉयल ब्ल्यू मार्ट व्हिस्कीच्या 750 मिली क्षमतेच्या एकूण 15000 सीलबंद बाटल्या मिळवून आल्या. याप्रकरणी ट्रकचालक बनवारी राम याला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई दुय्यम निरीक्षक डॉ. उमा पाटील, सहायक दुय्यम निरीक्षक पी. आर. गायकवाड, विनोद बनसोडे, महिला जवान राणी काळोखे यांनी केली. दुय्यम निरीक्षक डॉ. उमा पाटील तपास करीत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.