शरद पवारांसोबत पार्टनरशिप करून देतो; दोन कंपन्या सुरु करू!; पोलीस कर्मचाऱ्यालाच 93 लाखांचा गंडा
मुंबई : खरा पंचनामा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाने फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुंबई पोलीस दलात हवालदार असलेल्या विजय गायकवाड यांना शरद पवारांच्या नावाने गंडा घालण्यात गायकवाड यांना शरद पवारांच्या नावाने गंडा घालण्यात आलेला आहे. त्यांची तब्बल ९३ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे.
शरद पवारांचा सहभाग असलेल्या दोन कंपन्यांसोबत भागिदारी करुन देतो, अशी बतावणी करत व्यावसायिकाने ५७ वर्षीय विजय गायकवाड यांना गंडा घातला. गोरेगावात राहणाऱ्या ४८ वर्षीय अपूर्व जगदीश मेहताने गायकवाड यांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ४०६ आणि ४२० च्या अंतर्गत अपूर्व जगदीश मेहता विरोधात सहार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २०२० पासून गायकवाड यांना गंडा घातला आहे. गायकवाड आणि मेहता यांची अनेकदा भेट व्हायची. यातूनच दोघांची ओळख झाली. शरद पवारांच्या आदेशावरुन आपण कंपनी सुरु असल्याचे मेहनाने २०२१ मध्ये गायकवाड यांना सांगितले. मेहताने गायकवाड यांना भागिदार होण्याचा प्रस्ताव दिला. एका कंपनीला तुमच्या लेकीचे नाव देऊ आणि दुसरी कंपनी तुमच्या मुलाच्या नावाने सुरु करु, अशी ऑफर मेहताने गायकवाड यांना दिली होती.
तुम्ही शरद पवारांचे व्यावसायिक भागीदार व्हाल. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी १ कोटी रुपयांची गरज लागेल, असे मेहताने गायकवाड यांना सांगितले. मेहता यांच्यावर विश्वास ठेवून गायकवाड यांनी त्यांचा फ्लॅट विकला, एलआयसीकडून कर्ज घेतले आणि प्रॉव्हिडंट फंडातून पैसे काढले. मुलांचे भवितव्य सुरक्षित होईल या हेतूने गायकवाड यांनी मेहताला ९३ लाख रुपये दिले. पण व्यवसाय सुरु झाला नाही. त्यामुळे गायकवाड यांना चिंता वाटू लागली.
व्यवसाय का सुरु होत नाही याबाबत गायकवाड यांनी मेहताकडे विचारणा केली. त्यावर पवारांना तुमच्या लेकीच्या कुंडलीत राहू दोष आढळून आला. त्यामुळे तुम्ही दक्षिणेश्वर काली मंदिरात पूजा करा, असा सल्ला मेहताने दिला, गायकवाड यांनी त्यावरही विश्वास ठेवला आणि मह पूजा केली. यानंतर मेहताने गायकवाड यांना दिंडोशी कोर्टात बोलावले. कंपनीची स्थापना करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगून त्याने काही कागदपत्रांवर गायकवाड यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या.
त्यानंतर गायकवाड यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन गाठत फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.