शासकीय कार्यालयांचे पार्किंग बनले चार्जिंग स्टेशन!
सांगली पोलिस मुख्यालयातील प्रकार, वरीष्ठ अधिकारी कारवाई करणार का?
सांगली : खरा पंचनामा
शासकीय कार्यालयांचे पार्किंगच आता इलेक्ट्रिक वाहनांचे चार्जिंग स्टेशन बनल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. पोलिस मुख्यालयातील अधीक्षक कार्यालयाच्या पार्किंगमध्येच इलेक्ट्रिक वाहने चार्ज केली जात असल्याचे दिसून आले आहे. बेकायदेशीररित्या शासकीय कार्यालयात वाहने चार्जिंग करणाऱ्यांवर वरीष्ठ अधिकारी कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
प्रदुषण मुक्तीसाठी इलेक्ट्रिक वाहने वापरण्याबाबत शासनाकडून प्रसार, प्रचार केला जात आहे. नागरिकांना अशी वाहने घेण्यासाठी प्रवृत्तही केले जात आहे. पारंपरिक इंधनावरील वाहनांपासून होणारे प्रदुषण रोखण्यासह मर्यादित इंधना साठ्याला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढला आहे. नागरिकांनीही आता मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहने खरेदी केली आहेत.
सोमवारी दुपारी सांगलीतील शासकीय कार्यालयात एक अजबच प्रकार उघडकीस आला. येथील पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या पार्किंगमध्ये चक्क दोन दुचाकी चाजिर्गला लावल्याचे दिसून आले. दुचाकी चालकांनी कार्यालयिन प्रमुखांची याबाबत परवानगी घेतली होती की नाही हे समजू शकले नाही. मात्र काहींनी तेथील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी त्या वाहनांचे चार्जिंग किट जप्त केली आहे. शासकीय कार्यालयाच्या पार्किंगमध्ये वाहनांचे चार्जिंग करणाऱ्या संबंधितांवर वरीष्ठ अधिकारी कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.