महिला वाहतूक पोलिसावर पेट्रोल ओतत जाळण्याचा प्रयत्न
पुणे : खरा पंचनामा
पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी कारवाई करत असताना एकाने महिला वाहतूक पोलिसाच्या अंगावर पेट्रेल ओतत जाण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान या प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
वाहन अडवल्याच्या कारणावरून पुण्यात एका महिला वाहतूक पोलिसाला भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही धक्कादायक घटना शहरातील बुधवार चौकात शुक्रवारी (ता. ५ जुलै) सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान काल रात्री महिला वाहतूक पोलिसाबरोबर ही धक्कादायक घटना घडल्यामुळे शरहारात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाबाबत समोर आलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सध्याकाळी साडे पाच ते सहाच्या सुमारास बुधवार पेठ चौकात वाहतूक पोलीस वाहतुकीचे नियमन करत होते. त्यावेळी महिला पोलीस अधिकाऱ्याने एका वाहनाला चौकशीसाठी अडवले. यानंतर वाहनचालकाची महिला अधिकाऱ्याशी बाचाबाची झाली. यावेळी आरोपीने महिला अधिकाऱ्यावर बाटलीतील पेट्रोल फेकले. परंतु त्यावेळी नेमके लायटर न पेटल्यामुळे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी सुदैवाने बचावले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.