नारायण राणे यांच्या खासदारकीला ठाकरे गटाचं आव्हान, मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली याचिका
मुंबई : खरा पंचनामा
भाजप नेते नारायण राणे यांच्या खासदारकीला ठाकरे गटाने आव्हान दिलं आहे. नारायण राणे हे लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग मतदारसंघातून निवडून आले आहेत. आता नारायण राणे यांच्या खासदारकीला शिवसेना नेते विनायक राऊत यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
मते विकत घेऊन, मतदारांना धमकावून विजय मिळवला असल्याचा आरोप करत विनायक राऊत यांनी याचिका दाखल केली आहे. मते विकत घेऊन आणि धमकावून विजय मिळवला असल्यामुळे नारायण राणे यांचा विजय रद्द करा तसेच निवडणूक काळातील भ्रष्टाचाराच्या सखोल चौकशीसाठी स्वतंत्र समिता नेमण्याचे आदेश द्या, अशी मागणी विनायक राऊत यांनी याचिकेतून केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.