Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

डांबर घोटाळा, मंत्र्यांच्या वरदहस्ताने शेकडो कोटी उकळल्याचा आरोप

डांबर घोटाळा, मंत्र्यांच्या वरदहस्ताने शेकडो कोटी उकळल्याचा आरोप



मुंबई : खरा पंचनामा

राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज विधानसभेत पुरवणी मागणीच्या चर्चेदरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागातील डांबर घोटाळा उघडकीस आणला. सरकारमधील मंत्र्याच्या वरदहस्ताने डांबराच्या बिलातून शेकडो कोटी रुपये उकळले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील आर.डी. सामंत कन्स्ट्रक्शन ही कंपनी अनेक शासकीय कामांचे कंत्राट घेते. आपल्या सरकारमधील एका मंत्र्यांचे (पालकमंत्री उदय सामंत) सगेसोयरे या कंपनीमध्ये कार्यरत आहेत. या मंत्र्यांच्या वरदहस्तामुळे या कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभाग, एमआयडीसी, नॅशनल हायवे इत्यादी विभागांमध्ये कामे घेऊन प्रचंड मोठा घोटाळा केला असल्याचे आरोप यावेळी त्यांनी केले.

यावेळी या कंपनीने केलेल्या कारभाराची 3 उदाहरणं देत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अशा प्रकारचे शेकडो कोटींचे अनेक भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला. या प्रकरणात अनेक अधिकारीही सामील असून तेही या भ्रष्टाचारास तितकेच जबाबदार आहेत.

नेवरे भांडारपूळे रोड या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केलेल्या रस्ता रुदीकरण आणि ब्लॅक टॉपींग कामासाठी वापरलेल्या डांबराचे पावती क्रमांक BPCL 4582165210 हा आणि MIDC अंतर्गत रत्नागिरी पाणी पुरवठा योजना अंतर्गत हार्चेरी जॅकवेल पर्यंत जाणारा अॅप्रोच रस्ता पुर्नडांबरीकरणाचे केलेले कामाचे डांबराच्या बिलाचा नंबर देखील सारखाच आहे. म्हणजेच या दोन्ही कामासाठी देखील एकच डांबर बील वापरून पैसे काढण्याचे काम झाले आहे.

एप्रिल 2023 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग उत्तर रत्नागिरी अंतर्गत उपविभाग क्रमांक 1 यांनी निवळी जयगड या रस्ता कामासाठी वापरुन संपवलेली डांबराची बिले ऑगस्ट 2023 मध्ये ..
Rehabilitation & Upgradation of NH-66 (Old NH-17) कांटे ते वालकेड
Rehabilitation & Upgradation of NH-66 (Old NH-17) अरावली ते कांटे या दोन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कामांसाठी दाखवून 8 कोटी 52 लाख 53 हजार 641 रुपये उकळले आहेत.

यात महत्वाची बाब म्हणजे टेंडर मधील अटी व शर्तीनुसार ज्यावेळी अभियंता डांबराचा वापर दाखवतो त्यावेळी ठेकेदाराने दिलेल्या ओरीजनल बिलावर क्रॉस करुन कार्यालयाचा सही शिक्का मारुन त्याची झेरॉक्स ठेकेदाराला इतर लेखा ठेवण्यासाठी परत द्यावयाची असते. ज्यावेळी डांबराची बिले एप्रिल २०२३ मध्ये उपअभियंता सा.बां. उप विभाग क्र. १ यांनी वापरली त्यावेळी बिल क्रॉस न करता ओरिजनल डांबराची बिले ठेकेदाराला परत केल्याने तीच बिले ठेकेदाराने दुसऱ्या कामासाठी म्हणजेच राष्ट्रीय महामार्गावर वापरुन, न केलेल्या कामाच्या बिलाची रक्कम घेतलेल्या आहेत. या सर्व कामामध्ये संगमताने साडे आठ कोटी पेक्षा जास्त रक्कमेचा अपहार झालेला आहे असे जयंत पाटील यांनी सभागृहात सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.