पूजा खेडकरच्या वडिलांना लाचखोरीमुळे सक्तीची निवृत्ती ? ठाकरे सरकारच्या काळात झालं होतं निलंबन
पुणे : खरा पंचनामा
प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणामुळे राज्यासह देशात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दररोज नवनवी माहिती समोर येत आहे. आता या प्रकरणाशी संबंधित पूजा खेडकरच्या वडिलांचे निलंबन आणि लोचखोरीची प्रकरणे समोर आली आहेत.
दरम्यान पूजा खेडकरचे वडिल दिलीप खेडकर महाराष्ट्र सरकारच्या सेवेत होते. या कालावधीत त्यांचे दोन वेळा निलंबन झाले होते. त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संचालक म्हणून कार्यरत असताना खेडकर यांना सरकारने सक्तीची निवृत्ती दिली होती. याबाबतचे वृत्त इंडिया टुडे या संकेतस्थळाने दिले आहे.
पूजा खेडकरचे वडिल दिलीप खेडकर राज्य सरकारच्या सेवेत असताना 2007 पासून तीन वर्षे कोल्हापूरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये विभागीय अधिकारी होते. खेडकर यांनी या कार्यकाळात अनेक गैरव्यवहार केल्याचा आरोप करणार पोस्ट एका युजरने एक्सवर लिहिली आहे.
या पोस्टमध्ये युजरने असा आरोप केला आहे की, "कोल्हापूरमध्ये खेडकर प्रदूषण मंडळात विभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना छोट्या-मोठ्या कारखान्यांना भेट देत कोणाला चिमणी लहान आहे, मोठी कर, कोणाला स्करबर वेगळा लाव असे सांगत. पुढे ते स्वतःच्या Thermovetara या कंपनीचे कार्ड देत व सांगत आठ दिवसात पर्चस ऑर्डर काढून आगाऊ रक्कम पाठवा अन्यथा क्लोजरची कारवाई करू. याच कंपनीत खेडकरची पत्नी, मेहुणा व पूजा संचालक आहेत."
दिलीप खेडकरांवर असलेल्या आरोपांमध्ये पुणे आणि साताऱ्यातील उद्योजकांना त्यांनी त्रास दिल्याचेही आरोप आहेत. 2019 मध्ये, साताऱ्यातील सोना अलॉयज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने, 50,000 रुपयांची जास्तीची लाच देण्यास नकार दिल्याबद्दल खेडकर यांनी त्यांचा छळ केल्याचा आरोप केला होता.
दुसरीकडे पुण्यातील सुप्रभा पॉलिमर अँड पॅकेजिंग या फर्मने तक्रारीत खेडकर यांच्यावर २० लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप केला आहे. यानंतर उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या कार्यकाळात 2020 मध्ये दिलीप खेडकर यांचे निलंबन करण्यात आले होते.
दिलीप खेडकर यांच्या कार्यकाळात त्यांच्याविरोधात अनेक तक्रारी येत असल्यामुळे महाराष्ट्र सरकारने त्यांना 2023 मध्ये सक्तीची निवृत्ती घ्यायला लावली होती.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.