Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

तुरुंगात पुन्हा खुनी खेळ! सराईत गुन्हेगाराची धक्कादायक पद्धतीने हत्या

तुरुंगात पुन्हा खुनी खेळ! 
सराईत गुन्हेगाराची धक्कादायक पद्धतीने हत्या



पुणे : खरा पंचनामा

पुण्याच्या येरवडा तुरुंगामध्ये पुन्हा धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येरवडा तुरुगात पुर्ववैमनस्यातून एका आरोपीची हत्या करण्यात आली आहे. हा आरोपी सराईत गुंड असल्याचं कळतंय. तिघांनी त्याची तीक्ष्ण हत्याराने हत्या केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

माहितीनुसार, सकाळी तीनच्या सुमारात ही घटना घडली. सराईत आरोपीचे नाव सुधीर गवस असं असल्याचं कळत आहे. सुधीर गवत आणि तुरुगातील अन्य तीन आरोपींचे भांडण होते. याच रागातून तिघांनी त्याला संपवलं आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. मात्र, येरवडा तुरुगात हत्या होण्याची ही पहिली घटना नाही. याआधी देखील आरोपींच्या हत्या करण्यात आल्याचं समोर आलेलं आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.