Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"काँग्रेसने मला उमेदवारी दिली नाही तर सांगलीच्या विशाल पाटलांचा पॅटर्न वापरणार"

"काँग्रेसने मला उमेदवारी दिली नाही तर सांगलीच्या विशाल पाटलांचा पॅटर्न वापरणार"



मुंबई : खरा पंचनामा

आगामी विधानसभा निवडणुकीत वांद्रे पूर्व मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून वरुण सरदेसाई वांद्रे पूर्व मतदारसंघात सक्रिय झाले आहेत.

मविआने वरुण सरदेसाई यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यास या मतदारसंघातील काँग्रसचे विद्यमान आमदार झिशान सिद्दीकी यांचा पत्ता गट होणार, हे स्पष्ट आहे. या पार्श्वभूमीवर झिशान सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाला निर्वाणीचा इशारा दिला आहे. जर वांद्रे पूर्व मतदारसंघातून मला उमेदवारी मिळाली नाही तर इथेदेखील सांगलीसारखी परिस्थिती निर्माण होईल, असे झिशान यांनी म्हटले.

सध्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व पक्षांच्या चर्चा सुरु आहेत. मुंबईतील सर्व विधानसभेची चाचपणी सुरू असताना महाविकास आघाडीतील शिवसेना यांनी वांद्रे पूर्व या मतदारसंघावर दावा ठोकला आहे. या मतदारसंघातून वरुण सरदेसाई यांचे नाव सध्या तरी चर्चेत आहे. मात्र, काँग्रेसने मला या मतदारसंघातून संधी नाकारली तर मी विधानसभा निवडणुकीत अपक्ष लढेन, असा पवित्रा झिशान सिद्दिकी यांनी घेतला आहे.

झिशान सिद्दिकी यांचे वडील बाबा सिद्दिकी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटात प्रवेश केला होता. या पक्षप्रवेशापूर्वी अजित पवार हे झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयात होतो. यावेळी झिशान सिद्दिकी यांची अजितदादांच्या स्वागतासाठी लगबग सुरु असल्याचे दिसून आले होते. झिशान यांनी अजितदादांना कार्यालयातील आपल्या खुर्चीत अजित पवार यांना आग्रहाने बसवले होते. यानंतर काँग्रेसने झिशान सिद्दिकी यांची मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन उचलबांगडी केली होती.

मी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी नक्की मागेल. जर ही जागा काँग्रेसने ठाकरे गटासाठी सोडली तर इथेदेखील परिस्थिती सांगली सारखीच होऊ शकते. किती काय झालं तरी आम्ही या मतदारसंघातून निवडणूक लढवणारच, असे झिशान सिद्दीकी यांनी म्हटले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.