Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बारमध्ये अद्यापही अल्पवयीनांना मद्य विक्री सुरूच! नियमांच्या फलकांची केवळ कागदोपत्रीच नोंद?

बारमध्ये अद्यापही अल्पवयीनांना मद्य विक्री सुरूच!
नियमांच्या फलकांची केवळ कागदोपत्रीच नोंद?



सांगली : खरा पंचनामा


पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर रात्री उशीरापर्यंत सुरू राहणाऱ्या बारसह २१ वषार्खालील तरूणांना दारू न देण्याबाबतचे नियम कडक करण्यात आले आहेत. मात्र याची अंमलबजावणी मात्र होताना दिसत नाही. या नियमांचे फलक प्रत्येक परमिट रूम बिअर बारमध्ये दर्शनी भागात लावण्याचे आदेश उत्पादन शुल्क विभागाने संबंधितांना दिले आहेत. मात्र सांगली जिल्ह्यातील अनेक बारमध्ये अनेक बारमध्ये असे फलकच दिसत नाहीत. पुण्यातील अपघातानंतर नियमांचे फलक लावल्याची केवळ कागदोपत्रीच नोंद आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे. 

२५ वर्षापेक्षा कमी वयाच्या व्यक्तीला परमिट रूम बिअर बारमध्ये मद्य सेवन करता येणार नाही, तसेच २१ वर्षापेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना सौम्य मद्य सेवन करता येणार नाही त्याचबरोबर मद्यसेवन परवाना नसलेल्यांनाही मद्यसेवन करता येणार नाही. अशा मजकुराचा फलक बारमध्ये लावण्यास सक्तीचे करण्यात आले आहे. याबाबतची खात्री राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून केली जाते. मात्र फलकावरील सूचनांचे किती बारमध्ये पालन केले जाते हा संशोधनाचा विषय बनला आहे. 

पुण्यातील घटनेनंतर सांगली, मिरज शहरातील कित्येक बार रात्री उशीरापर्यंत सुरू असतात. अशा बारमध्ये मद्यसेवन परवाना असल्याची खात्री न करता २५ वर्षाखालील व्यक्तींना सर्रास मद्य पुरवले जाते. काही ठिकाणी तर अल्पवयीन मुलेही मद्यसेवन करताना दिसत आहेत. मात्र त्यावर संबंधित बार चालकांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे पुण्यातील अपघाताच्या घटनेनंतर चर्चेत आलेले नियम आता बासनात गुंडाळले आहेत का? असा प्रश्न निर्माण होत आहे. 

राज्य शासनाने नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या असतानाही नियमांची पायमल्ली होत असल्याने आता विरोधी पक्षातील आमदार सध्या सुरू असलेल्या विधीमंडळाच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार का अशी चर्चा आता रंगली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.