पोलिस, होमगार्ड, डॉक्टर, नर्सेस, अग्निशमन दलासाठी स्वतन्त्र आमदार का नाही?
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांचा सवाल
मुंबई : खरा पंचनामा
राज्यात दोन दिवसात विधानपरिषदेच्या आमदारांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर वरीष्ठ निवृत्त आयपीएस अधिकारी, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी एक प्रश्न उपस्थित केला आहे. शिक्षक, पदवीधर तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्रतिनिधींसाठी आमदार निवडण्यात येतात. मात्र देशाच्या सेवेसाठी २४ तास स्वतःच्या जीवाची पवार् न करता कतर्व्य बजावणाऱ्या पोलिस, होमगार्ड, डॉक्टर, नर्सेस, अग्निशमन दल यांच्या स्वतंत्र आमदार का नाही. त्यांचा आवाज कोण उठवणार असा प्रश्न पांडे यांनी फेसबूक पोस्टद्वारे उपस्थित केला आहे.
माजी पोलिस आयुक्त पांडे यांची पोस्ट जशीच्या तशी
आज महाराष्ट्र विधान परिषदेची आमदारांची लिस्ट पाहण्यात आली. वस्तुनिष्ठपणे पाहण्यात आलं तर असं दिसून येतं की, शिक्षकांसाठी आमदारांची खरंच आवश्यकता आहे का? स्थानिक स्तरावर नगरसेवक, आमदार, खासदार असतात, त्याशिवाय प्रत्येक क्षेत्रातील मान्यवर अथवा अधिकार संपन्न व्यक्तिमत्त्वांसाठी बारा जागा मा. राज्यपाल यांच्याद्वारे नियुक्त केले जातात. तरीदेखील फक्त शिक्षकांसाठी स्वतंत्र मतदारसंघ निर्माण केले गेले आहेत ? त्याशिवाय नगरसेवक महापौर असताना देखील स्थानिक प्राधिकारी संस्थांसाठी स्वतंत्र आमदारांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पदवीधरांचे एक वेळ समजू शकतो त्यांच्या बेरोज्नोगारीबाबत व नोकरी संदर्भातील अथवा इतर गरजा असतात परंतु फक्त शिक्षकांसाठी अशाप्रकारे आमदार असणे योग्य आहे का? मग जे 24 तास स्वतःच्या जीवाची परवा न करता सेवेसाठी कार्यरत आहेत अशा पोलीस, राज्य राखीव पोलीस बल, कारागृह पोलीस, होमगार्ड, डॉक्टर्स, नर्सेस, अग्निशमन दल, महाराष्ट्र सुरक्षा बल, यांच्या वाजवी मागण्यासाठी आवाज कोण उठवणार? मग त्यांच्यासाठी स्वतंत्र आमदाराची आवश्यकता नाही का? संदर्भासाठी खालील लिंक पहा
http://mls.org.in/PDF2024/monsoon/list-of-member-council.pdf
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.