यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार खासदार सुधा मूर्ती यांना जाहीर
पुणे : खरा पंचनामा
यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार खासदार सुधा मूर्ती यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे हे ४२ वे वर्ष आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रोहित टिळक यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली आहे.
सध्या राज्यसभेचे अधिवेशन कामकाज सुरू आहे, त्यामुळे राज्यसभा खासदार सुधा मूर्ती पुण्यात येऊ शकणार नाहीत. त्यांच्या विनंतीला मान देऊन यंदा प्रथमच पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम दिल्ली येथे महाराष्ट्र सदनात होणार आहे. 1 ऑगस्ट रोजी 6:30 वाजता हा कार्यक्रम महाराष्ट्र सदनात होणार आहेत. या पुरस्काराचे स्मृतिचिन्ह, मानपत्र, एक लाख रुपये असे स्वरूप असणार आहे.
यावेळी नेते शरद पवार, शाहू छत्रपती महाराज, केरळचे माजी गृहमंत्री रमेश चेन्नीथला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय महाराष्ट्रातील खासदारही या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.