मराठा आरक्षणावरुन सभागृहात गोंधळ, बैठकीला हजर न राहिल्यानं सत्ताधाऱ्यांचा संताप, विधानसभेचं कामकाज तहकूब
मुंबई : खरा पंचनामा
मराठा आरक्षणावरुन सभागृहात गोंधळ सुरु आहे. भाजप आमदार आशिष शेलार आणि आमदार अमित साटम यांनी काल बैठकीला न आल्यामुळे विरोधकांवर टीका केली आहे.
त्यावरुन गदारोळ सुरु झाला आहे. महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण केली जात आहे. यावर तोडगा काढण्यासाठी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर विरोधीपक्षांनी बहिष्कार टाकला. विरोधकांना केवळ राजकारण करायचं आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास आपली भूमिका काय? विरोधकांनी भूमिका स्पष्ट करावी असे, अमित साटम यांनी म्हटलं आहे. दरम्यान, गोंधळामुळं सभागृहाच कामकाज स्थगित करण्यात आलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.