एकनाथदादा १५०० रुपये कशाला रे? त्यापेक्षा सिलेंडरच २०० ला देना
एकनाथ शिंदेंच्या 'एका' बहिणीचे भावनिक पत्र
पुणे : खरा पंचनामा
अर्थसंकल्पात पत्नीला बहिणीच्या विरोधात उभे करणाऱ्या आणि पडल्यानंतरही बहिणीच्या नाकावर टिच्चून पत्नीला खासदार बनविणाऱ्या अजितदादांनी मुख्यमंत्र्यांच्या नावाने माझी लाडकी बहिण अशी योजना अर्थसंकल्प मांडताना घोषित केली आणि महिलांना १५०० रुपये महिना देण्याचे जाहीर करताच त्यावर एकीकडे तुंबळ गर्दी होत असताना दुसरीकडे अनेकाएक प्रतिक्रिया उमटू लागल्यात असेच पुण्यातील एका महिलेने यावर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच भाऊ मानून जाहीर पत्र पाठविले आहे जे मोठे बोलके आहे, ते जशाच्या तशा शब्दात ....
आदरणीय एकनाथ (दादा) शिंदे मुख्यमंत्री - महाराष्ट्र राज्य
दादा !
पत्र लिहिण्यास कारण की, तू सुरू केलेली लाडकी बहीण माझी या योजने अंतर्गत आम्हाला तू महिना 1500/- रुपये देणार आहेस. पण दादा हे पैसे आम्हाला नको. याबद्दल तू घरातील गॅसचे दर कमी कर, इंधनाचे दर कमी कर, विजेचा दर कमी कर, चांगले रस्ते तयार कर, वाहतूक समस्या सोडवण्याचा प्रयत्न कर, तरूणांना ड्रग्जमुक्त कर, कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा प्रयत्न कर आणि सगळ्यात महत्वाच सरकारी दरबारी होणारा भ्रष्टाचार कमी कर ना दादा. जेणेकरून असा विचार केलास तर तुझ्या भावोजींना पैशाची चणचण लागणार नाही. त्यांच्या कमी पगारात, कमाईत पण तुझी बहीण सुखी राहील. दादा, आणखी एक विनंती करते.. तुझ्या लाडक्या भाचा -भाचीची शाळेची फी पण काय कमी करता येते का बघ जेणे करून तुझे भाचे सगळ्याना सांगतील माझा मामा मुख्यमंत्री झाला त्यामुळे मी एवढे मोठे शिक्षण घेतले म्हणून तुझ्या नावाने दिमाखात फिरतील. माझ्या मामानं केल्यान, माझ्या मामानं केल्यान म्हणून तुझ नाव जगभर करतील.
दादा.. आम्हाला 1500 रु खरंच नको देऊ रे! पण आमच्या संसारात ज्या आवश्यक गोष्टी लागतात तेवढ्या तरी काय कमी भाव करता येतात का तर बघ.
तूझी लाडकी बहीण
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.