कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला
रामदास शेळके यांची नियंत्रण कक्षात बदली
अनुजा कारखेले
नाशिक शहर : खरा पंचनामा
नाशिक शहरांतील काही वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशावरून करण्यात आल्या आहेत. त्यानुसार काही प्रभारी अधिकाऱ्यांना नियंत्रण कक्षात नियुक्ती देण्यात आली, तर काही प्रभारी अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्याचा पदभार सोपवत वरिष्ठांनी विश्वांस दर्शविला आहे. पोलीस आयुक्तालयातील पोलीस निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या जाहीर केल्या आहेत, तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने व आर्थिंक मुद्दे व इतर कारणांतून तक्रारी प्राप्त अधिकाऱ्यांना पोलीस आयुक्तांचा दणका बसला आहे.
यामध्ये गंगापूरच्या प्रभारी तृप्ती सोनवणे यांची नाशिकरोड दुय्यम, सुभाष ढवळे सातपूरचे सोहन माच्छरे आणि नाशिकरोडचे रामदास शेळके नियंत्रण कक्षात नियुक्त, तर मुंबई नाक्याचे पो.नि. अशोक गिरी यांची नाशिकरोड पोलीस ठाण्यात तर अंबडचे पो.नि. दिलीप ठाकूर यांची गंगापूर तर भद्रकालीचे दुय्यम निरीक्षक संतोष नरुटे यांची मुंबई नाका प्रभारी तर अंबडचे सुनील पवार यांच्या तात्पुरत्या प्रभारी पदी नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
नाशिकरोड पोलीस ठाण्याचे नूतन प्रभारी अधिकारी अशोक गिरी यांनी शनिवारी नाशिकरोड पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे. पोलीस निरीक्षक अशोक गिरी हे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक म्हणून त्यांची महाराष्ट्र पोलीस खात्यात ओळख आहे. त्यांनी संभाजीनगर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून उत्कृंष्ट सेवा दिली आहे. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांची नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात बदली झाली होती, सध्या त्यांच्याकडे मुंबई नाका पोलीस ठाण्याचा पदभार होता. पोलीस ठाण्याचा पदभार घेतल्यापासून गिरी यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अनेक गुन्ह्यांची उकल करीत, पोलीस ठाण्याच्या परिसरांत जनतेशी जनसंपर्क वाढवून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले होते. आता नव्याने नाशिकरोड पोलीस ठाणेचा कार्यभार त्यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रामदास शेळके यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.